महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध : सामाज माध्यमांवर फिरणारा ‘तो’ संदेश दिशाभूल करणारा

505

– कृषि विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलबाबत सूचना
The गडविश्व
गडचिरोली, ८ मे : सोशल मीडियामार्फत सद्यस्थितीत महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत दिनांक १५ मे २०२३ पर्यंत असल्याचे तसेच दिनाक १५ मे २०२३ नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश/माहिती अज्ञाताने विविध सामाज माध्यमांवर प्रसारित केलेले आहेत. तरी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश/माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
“महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असुन सदर अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांनुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे.” तरी https://mahadbt.maharashtra.gov.in/ शेतकरी य़ोजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.

(the gdv) (the gadvishva) (gadchiroli mahadbt)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here