– वाघाच्या हल्ल्याने परिसरात दहशत
The गडविश्व
चिमूर, दि. १४ : वाघाच्या हल्यात तेंदुपत्ता तोडणीसाठी गेलेली महिला ठार झाल्याची घटना बुधवार १४ मे रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील करबडा परिसरात घडली. कचराबाई अरुण भरडे रा. करबडा (वय ५२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
सध्या तेंदू पत्ता हंगाम सुरू झालेला असून चिमूर तालुक्यातील करबडा येथील महिला व पुरुष हे जंगल परिसरात तेंडूपत्ता तोडण्यासाठी नेहमीप्रमाणे आज सकाळच्या सुमारास गेली. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने कचराबाई भरडे यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती परिसरात पसरतात घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमलेली होती. वाघाच्या हल्ल्यातील घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाचे कर्मचारी व चिमूर पोलीस यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता करिता उपजिल्हा रुग्णालयात चिमूर येथे पाठविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार मृतकाच्या अंतिम संस्कारासाठी वनविभागाकडून पन्नास हजार रुपयाची (50000) आर्थिक मदत वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांनी तत्काळ दिली.
