कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एका चित्त्याचा मृत्यू

172

– आठवडाभरात दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू
The गडविश्व
नागपूर, १४ जुलै : आफ्रिकेतून आणलेल्या मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू (Cheetah Dies) झाला आहे. मृत झालेल्या चित्त्याचे नाव सूरज असे असून तो नर आहे. याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या वर्षी मार्चपासून श्योपूर जिल्हा उद्यानात मृत्यूमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या आठ झाली आहे. आफ्रिकेतून आणलेल्या तेजस या नर चित्ताचा तीन दिवसांपूर्वी उद्यानात मृत्यू झाला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सूरजला शुक्रवारी सकाळच्या सुमारास निरीक्षण पथकाने पालपूर पूर्व रेंजमधील मसावनी भागात जखमी अवस्थेत दिसून आला. जमिनीवर पडलेल्या सूरजच्या मानेवर किडे संचार करत होते. अशा अवस्थेत तो उठून पळू लागला. पशुवैद्यकीय डॉक्टर आणि वन अधिकार्‍यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुक्त क्षेत्रात बिबट्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असून त्याच्या पाठीवर आणि मानेवर जखमेच्या खुणा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here