अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी

173

The गडविश्व
प्रतिनिधी, ढानकी, १ ऑगस्ट : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती १ ऑगस्ट २०२३ रोजी ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बिटरगाव (बू )पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ दत्त दिगंबर वानखेडे, काँग्रेसचे अमोल तुपेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी प्रशांत विनकरे, नगरसेवक तसेच नगरपरिषद चे पाणीपुरवठा उपसभापती संबोधी गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख ढाणकी बंटी जाधवओम खोपे, रामरावजी गायकवाड आणि इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थित होते.
याप्रसंगी प्रथम अण्णाभाऊ साठे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ठाणेदार बनसोड मॅडम यांनी मनोगत व्यक्त करतांना समाजामध्ये एकता ठेवून समाजाचा विकास कसा होईल यावर सर्वांचे लक्ष केंद्रित केले व मार्गदर्शन केले, रामरावजी गायकवाड यांनी सुद्धा समाजप्रबोधन मार्गदर्शन केले तसेच प्रशांत विनकरे यांनी सुधा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आवर्जून गावातील प्रतिष्ठित नागरिक रुपेश कोडगिरवार, संतोष कुंबरवार, आनंद येरावार, धुळे आणि इतर सर्व मान्यवर व समाज बांधव दिलीप कलाले, राम गाडेकर, बालू पडोळे, अनिल सोळंके, साई पडोळे,मनोहर पडोळे,अशोक पडोळे, राजू पडोळे, करण सोळंके,गणू पडोळे, अभिषेक पडोळे, हरीश गाडेकर, मारोती पडोळे, तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते. शेवटी संजय पडोळे यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here