गेवर्धा आविका संस्थेवर सावकार गटाचे अनिराम बोगा सभापती तर उपसभापती पदावर लाडे यांची निवड

104

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३० : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गेवर्धा येथील पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीत प्रकाश सावकार पोरेड्डीवार गटाचे अनिराम बोगा यांची सभापती पदावर तर परसराम लाडे यांची उपसभापती पदावर अविरोध निवड झाली. सदर निवड प्रक्रिया गुरुवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ५ वाजता लदरम्यान संस्थेच्या सभागृहात पार पडली.
गेवर्धा आविका संस्थेचा संचालक मंडळाची निवडणूक मागील आठवड्यातच पार पडली होती. संचालक मंडळाच्या निवडणूकीत सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार यांचा मार्गदर्शनात व्यंकटी नागीलवार, अनिराम बोगा, परसराम लाडे, तुकाराम नहामूर्ते, देवनाथ मरस्कोल्हे, सिताराम गावळे, शिवलाल कवडो, माणिक गायकवाड़, शामलता आळे व रूपाली पूसाम या १० संचालकाचा विजय झाला होता तर विरोधी गटाचे सुधिर बाळबूध्दे, प्रभाकर कूळमेथे व जनार्धन डोगंरवार यांनी विजय मिळविला होता. दरम्यान २९ ऑगस्ट रोजी सर्व उपस्थित संचालक मंडळामधून सभापती उपसभापति पदाची निवड प्रक्रिया अविरोध पार पडली. निवडणूकीची जवाबदारी सहकार अधिकारी श्रेणी १ सूशिल वानखेडे यानी पार पाडली तर संस्थेचे व्यवस्थापक आर बी मस्के, लिपीक पी एस कावळे व टी बी मेश्राम यांनी सहकार्य केले.
निवडणूक परिणामाची घोषणा होताच गटनेते व्यंकटी नागीलवार, देवानंद खूणे, जावेद शेख, विवेक बूद्धे, प्रणय खूणे, मंगेश कराडे, विजय नेवारे, अनिल बूद्धे, अजय गायकवाड़, सिताराम गायकवाड़, डॉ.टेभूंर्णे, मधूकर शेंडे, डॉ कावळे, हेमंत शिडाम, फागोजी तूलावी, सूखदेव नैताम, हेमराज ठेलकर, जिवन पर्वते, दारसू कचलामी, अशोक नखाते, दुर्योधन टिकले, विनोद दोनाडकर, साबू पठान, राजू पठान, यादव नाकतोडे, डाकराम मैंद, भजन गावळे, तेजराम पिल्लारे, बळीराम मेश्राम, संदीप दर्रो, टिकाराम कवडो, भावेश कांबळे, मोतीराम उईके, सीताराम उईके यानी विजय उत्सव गुलाल उधळत साजरा केला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here