ग्राहकांच्या न्यायहक्कासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत लढणार : विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नाराणय मेहरे

170

The गडविश्व
गडचिरोली, ३ एप्रिल : बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारात वेगवेगळे बदल झाले असून सुशिक्षित व्यक्ती सुद्धा आपले कर्तव्य व इतर हक्क विसरत चालला आहे. कुठल्याही वस्तू वा सेवा प्रकारची खरेदी, ऑनलाईन खरेदी करताना त्याची होणारी फसवणूक ही वाढू लागली आहे अशा स्थितीत त्याला योग्य मार्गदर्शन व उपयुक्त सल्ला व माहिती मिळणे आवश्यक आहे, ग्राहकांच्या न्यायहक्कासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत लढणार असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नाराणय मेहरे यांनी केले. ते २५ मार्च रोजी गडचिरोली येथील सिटी हार्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट येथे झालेल्या सभेत मार्गदर्शन करतांना बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले कि गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या संघटन वाढिस भरीव अशी कामगिरी आजतागायत केलेली आहे.
२५ मार्च रोजी स्थानिक सिटी हार्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट येथे झालेल्या सभेत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या सभेला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सहसचिव जयंतीभाई कथेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या हस्ते जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शकपदी प्रकाश पाठक, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश त्रिनगरीवार, जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी कोंडावार, जिल्हा सचिव उदय धकाते, जिल्हा सहसचिव मिलिंद उमरे, जिल्हा सहसचिव डॉ. महेश जोशी, जिल्हा संघटनमंत्री विजय कोतपल्लीवार, जिल्हा सहसंघटनमंत्री शेमदेव चाफले, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष धंदरे, कोषाध्यक्ष नितीन भडांगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख निलेश पटले, जिल्हा महिला प्रमुख अंजली कुळमेथे, जिल्हा सह महिला प्रमुख माधुरी दहीकर, जिल्हा विधी सल्लागार ॲड. नीलकंठ भांडेकर, जिल्हा विधी सल्लागार ॲड. प्रमोद बोरावार, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांमध्ये प्रशांत भृगवार, नरेश सोनटक्के, उदय बोरावार, विलास भृगुवार, डॉ. पवन नाईक, डॉ. प्रिया गेडाम, गीता कस्तुरे यांचा समावेश आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा गडचिरोलीच्या कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्राहक पंचायत च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसातील काही जण एकत्र येऊन सर्वसामान्य माणसाला पडणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उकल करण्यासाठी मदत करतात हीच ती ग्राहक पंचायत ही संघटना होय. बिंदुमाधव जोशी व राजाभाऊ पोफळी यांच्यासह अनेक मराठी माणसांचे सहकार्य व मार्गदर्शनात सुरु झालेली हि संघटना गडचिरोली जिल्याच्या ग्राहकांच्या न्याय्यहक्कांसाठी योग्य मार्गदर्शन व उपयुक्त सल्ला देण्यासाठी कार्य करेल असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष यांही म्हटले आहे.
दरम्यान यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सहसचिव जयंतीभाई कथेरिया यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि अखिल भारतीय ग्राहक पंचायत भारतातील सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली अशासकीय संघटना आहे. आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या फसवणुकीपासून सावधान करीत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत विविध विषयांवर अभ्यास करून नवीन पारदर्शी कायदा करायला शासनाला प्रवृत्त करणारी ही संघटना आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) (Home theater explosion; Four people including a girl were injured and two died) (Gadchiroli: ‘Shetkari Kamgar Party’ in the election arena of Agricultural Produce Market Committee)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here