३ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर श्रीकृष्णाला मिळाले नवीन जीवनदान

483

The गडविश्व
गडचिरोली, ६ मार्च : राष्ट्रिय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शून्य ते अठरा वर्षातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण आरोग्य तपासणी करून सदर तपासणी दरम्यान गंभीर आजाराने ग्रस्त आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया करण्याकरिता संदर्भ सेवा देण्यात येते. याच तपासणी दरम्यान राबस्वाका टीम ब गडचिरोली यांना कु. श्रीकृष्ण जगदीश कुमरे मु. बोथेळा या विद्यार्थ्यास omphalocele या गंभीर जन्मदोशाने ग्रस्त असलेले आढळून आले. सदर विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया करिता पालकांची समजूत घालून सतत तीन वर्षे पाठपुरावा घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा, नागपुर येथे योग्यरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आले व कुमार श्रीकृष्ण ला विद्यार्थ्यास नव संजीवनी देण्यात आले. शस्त्रक्रिया करिता सदर सामन्य रूग्णालय, गडचिरोली येथील चमूनी लता मंगेशकर हॉस्पिटल येथे कुमार कुमार श्रीकृष्ण याला पाठवण्यात आले व यश प्राप्त झाले. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोळकी, डॉ. बागराज धुर्वे, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच लता मंगेशकर येथील पीडियाट्रिक सर्जन डॉ.अलबल मॅडम व संपूर्ण शस्त्रक्रिया टीम तसेच गडचिरोली येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ.मीनाक्षी खोब्रागडे, डॉ.संदीप सदावर्ते, लियास पठाण, नेत्रा ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

(The gadvishva) (Gadchiroli News) (The gdv) (shrikurshna) (lata mangeshkar Hospital hingna) (dr rude)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here