आदिवासींची आढावा बैठक व एल डी एम कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

166

The गडविश्व
गडचिरोली, ३ मे : मुंबई येथील टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या वतीने आदिवासी आढावा बैठक व एल डी एम कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, उद्घाटक म्हणून राष्ट्रीय एसटी एससी ओबीसी मायनॉरिटी चे समन्वयक के राजु, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी आशिष दुवा, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे समन्वयक केसी घुमरिया, राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, आमदार सहसराम कोरोटे, माजी मंत्री सावंत, विदर्भ संयोजक उपजीविका मंचचे दिलीप गोडे, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे, आदिवासीं युवा नेते लक्कीकुमार जाधव, आदिवासी नेते दिलीप मडावी, आदिवासी महासचिव विश्वनाथ किरकिरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे विविध सेलचे अध्यक्ष छगन शेडमाके, किसान सेलचे अध्यक्ष वामन सावसाकडे, भरत येरमे, भुपेश कोलते, दामदेव मंडलवार, रुपेश टिकले, भैय्याजी मुद्दमवार, ए. आर. पंजवानी, साहित्यिका कुसूम आलम, काँग्रेस नेते निताराम कुमरे, विश्वेश्वर दर्रो, कारे मडावी, राजेश नैताम आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आदिवासी समाज इंग्रज काळात सुध्दा न घाबरणारा समाज होता. इंग्रजांविरुद्ध त्यांच्या हुकूमशाही विरोधात पेटून उठायचे आणि आपले हक्क मिळविण्याचे प्रयत्न केला. अशा या साविधान विरोधी भाजपा सरकारच्या विरोधात पेटून उठून आपले हक्क मिळवावे असे यावेळी मार्गदर्शन केले.
पूर्वीपासूनच आदिवासी हे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारा वर्ग आहे. म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी बांधवांनी जागृत होऊन आदिवासींच्या न्याय, हक्क विरोधी भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस मध्ये एक नविन ऊर्जा डॉ. नामदेव उसेंडी यांच्या रुपाने प्रदेशाध्यक्ष पद मिळालेला आहे. त्यासाठी त्यांचे महाराष्ट्र भर आदिवासी पदाधिकारी व कार्यकर्ते तयार झाले आहेत. महाराष्ट्र भर कार्य सुध्दा होत असताना दिसत आहेत. महाराष्ट्रात आदिवासी युवा संघटना तयार करा आणि त्या युवकांना मार्गदर्शनातून मार्ग दाखवत रहा. त्या अनुषगाने महाराष्ट्रातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने एकसंघ होऊन काँग्रेस पक्षाच्या सोबत घेऊन येतील असा विश्र्वास काँगेस पक्षाचे गटनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

(the gdv, the gadvishva,)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here