लोहखनिज वाहतुकीत गुंतलेल्या ट्रकची मुख्य चौकात दुचाकीला धडक : एकजण गंभीर जखमी

1045

– गंभीर जखमीस रुग्णालयात केले दाखल 
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३ मे : तालुक्यातील मुरुमगाव येथील मुख्य मार्गावरिल चौकात लोहखनिज वाहतुकीत गुंतलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. हूमनसिगं किरसान (अंदाजे वय ४२) रा. बेलगाव असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड मार्गे मुरूमगाव येथे सीजी ०८ एटी ९२९५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने हूमनसिगं किरसान यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथील रुग्णवाहीकेने धानोरा येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. हेमंत कुमार (४५) रा.बालोद छत्तीसगढ
असे ट्रकचालकाचे नाव असून सदर ट्रक हे सूरजागड प्रकल्पातून लोह खनिज छत्तीसगढ राज्यतील रायपूर ला खाली करून वाहन परत येत होते. मुरूमगाव पोलिसांनी ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

(the gdv) (the gadvishva) (murumgaao dhanora surjagadh accident truck)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here