गडचिरोलीत पोलीसाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

5404

– आरोपी पोलीसास अटक, पोलीस विभागात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : सात वर्षीय मुलीवर गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस नायकाने लैगिक अत्याचार केल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी शहरात घडली. याबात पिडीतेच्या आईने मंगळवार २ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करून तपासात घेवून अवघ्या काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली आहे. बंडु सुकरूजी गेडाम (वय ५३) असे आरोपीचे नाव असून तो गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार यांचे घरगुती संबंध असुन आरोपीचे पिडीतेच्या घरी येण जाणे सुरू होते. दरम्यान २४ डिसेंबर रोजी पिडीता व तिची मैत्रीण हे खेळत असतांना आरोपीने दोघींना आपल्या घरी नेवून पिडीत ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पिडीतेच्या आईने गडचिरोली पोलीस ठाणे गाठुन याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा नोंद करून तपासात घेत काही तासातच आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. जनेतचे रक्षक असलेल्या पोलीसाकडूनच असे कृत्य होत असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाला आहे. सदर घटनेने शहरात रोश व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप हे करीत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here