मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी करून घेतला दारूबंदीचा ठराव
-येल्ला येथे ग्रामसभेत दारूबंदीच्या मुद्द्यावर चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथे आयोजित ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीचा एकमताने ठराव पारित करून विक्रेत्यांकडून २० हजारांचा दंड व पोलिस कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास निश्चितच गाव दारूमुक्त होणार अशी आशा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, सभेला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
येल्ला येथे अवैध दारूविक्री सुरु असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या गावामुळे जवळपासच्या अवैध दारूविक्री बंद असलेल्या गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील ठोक दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून विविध गावांतील किरकोळ दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा देखील केला जातो. त्यामुळे गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेच्या महिलांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. नुकतेच गावात आयोजित ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी दारूविक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आला. यामध्ये दारूविक्रेत्याकडून पहिल्यांदा दंड 20 हजार रू.दंड तसेच दुसऱ्यांदा दारूविक्री करताना आढळून आल्यास दंडासह पोलिस कारवाई करणे तसेच कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार असेही निर्णय घेण्यात आले. गावामध्ये अवैध दारूविक्री बंदीसाठी ग्रामस्थांनी ठराव पारित केला असून या ठरावाची अंमलबजावणी करणे गजरेचे आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटना गठीत करण्यात आली. सभेला सरपंच दिवाकर उराडे, पोलिस पाटील शंकर सेडमाके, पानेवार, साईनाथ पानेवार, माजी पोलिस पाटील यशवंत कोडापे, शामराव कोडापे, ग्रामपंचायत सदस्य ललिता कोडापे, कल्पना दहागावकर, तंमुस अध्यक्ष सुरेश रामटेके, शंकर पानेवार, रामदास टेकुलवार, मुक्तीपथचे रुपेश अंबादे व टीम प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेत मुक्तिपथ गाव संघटनेचे शंकर शेडमाके, दिवाकर उराडे, साईनाथ पानेवार, सुरेश रामटेके, यशवंत कोडापे, कल्पना दहागावकर, अलका कोडापे, मीना रामटेके, ललिता कोडापे, सईबाई उराडे,मी वनिता उराडे, अनिता शेडमाके, निशा रामटेके, वर्षा शेडमाके, दुर्गा टेकुलवार, शोभा टेकुलवार, यशवंताबाई कोडापे, मीनाक्षी गौरवार, कल्पना रामटेके, निर्मल आत्राम, शामला पानेवार, ललिता टेकुलवार, वनिता दंडकेवार, निर्मला हजारे, रंगुबाई टेकुलवार. अमाका आत्राम, रांगूबाई आत्राम यांच्यासह ग्रामस्थ व मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath )