युवा दिनानिमित्त उद्या नाटय स्पर्धेचे आयोजन

175

– सहभाग घेण्याकरिता आजची शेवटची तारीख
The गडविश्व
गडचिरोली, २३ ऑगस्ट : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा सामन्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या तर्फे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 12 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनानुसार नाटय स्पर्धेचे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील रेड रिबन क्लब (RRC) स्थापित महाविद्यालयातील विद्यार्थी करीता नाटय स्पर्धेचे शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे उद्या 24 ऑगस्ट 2023 रोजी आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व रेड रिबन क्लब (RRC) स्थापित असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी नाटय स्पर्धेतेत सहभाग घेण्याकरीता 23 ऑगस्ट 2023 पर्यत डाप्कु सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नोंदणी करावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम विजेतास रु.5000/-, द्वितीय विजेतास रु.3500/- व तृतीय विजेत्यास रु. 2000/- बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंबंधी काही अडचण असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डाप्कु, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here