धानोरा शहरातील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

99

The गडविश्व
गडचिरोली, ११ मे : धानोरा शहरातील वार्ड क्रमांक १२ येथील एका महिला दारूविक्रेत्याकडून मोहफुलाची दारू जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची कारवाई धानोरा पोलिसांनी केली. या कारवाईसाठी शहर संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेतला
धानोरा शहरातील वार्ड क्रमांक १२ मध्ये चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरु असल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ शहर संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांसह संबंधित दारूविक्रेत्याच्या घरी भेट दिली. यावेळी घरातून मोहफुलाची दारू जप्त करीत दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भजन कोडाप ,कपिल जीवने यांनी केली. यावेळी मुक्तीपथ शहर संघटनेच्या महिला अध्यक्ष सुनीता कुमरे, सुनीता बावणे, लक्ष्मी मडावी, विद्या मडावी, सुमन मेश्राम, रेखा मोहूर्ले व मुक्तीपथ कार्यकर्ते राहुल महाकुलकार उपस्थित होते.

(The gdv, the gadvisha, gadchiroli news updates, muktipath serch, dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here