तीन दिवसापासून रांगी- निमगाव मार्ग बंद

264

The गडविश्व
ता.प्र/ धानोरा,१८ जुलै  : सतत चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने रांगी निमगाव मार्गावरील पाल नाल्याला पुर आला याच पुराचे पाणी वाढल्याने निमगाव व बोरी मार्गावरील नाळवाही , इतर दोन पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग तिन दिवसापासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी ते निमगाव रस्त्यावर पाल नाला असुन आठवडाभर पडलेल्या पावसामुळे पूर आलेला असून या पुराचे पाणी निमगाव मार्गावरील तीन नाल्यावर पसरलेला असल्याने तिन ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने सध्या हा मार्ग बंद आहे. तरी सदर मार्गाकडे शासनाने लक्ष देऊन कमी उंचीच्या पुलांना दुरुस्ती करून उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.रांगी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव मार्गावरती रपट्याप्रमाने छोटासा पुलाचे बांधकाम केले आहे. अश्याच पुलाचे बांधकाम बोरी मार्गावर आहे. त्या पुलाची उंची खुप कमी असल्याने नेहमीच पाण्याचा प्रवाह असतो. तसेच पुलाचे बांधकाम फुटले असल्याने लोखंडी सळाखी बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुलावरून पाण्यातुन प्रवास करताना जिव धोक्यात टाकने आहे. तरीही प्रवासी, नागरिक, विद्यार्थी व कर्मचारी प्रवास करतांना दिसत आहेत. सततच्या पावसाळ्यामुळे सध्या तरी या मार्गावर पाणी असल्याने गावाचा संपर्क तुटलेला असून येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . मागील तीन दिवसापासून हा रस्ता पाण्याखाली असल्याने रांगी ते बोरी , निमगाव गावाला ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या मार्गावरील पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here