रांगी ग्रामपंचायतीत भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

2

भगवान बिरसा कलासंगम 2.0 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (LIVE)

रांगी ग्रामपंचायतीत भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
– बिरसा मुंडा यांच्या सामाजिक कार्याचा जागर
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १५ : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत कार्यालयात १५ नोव्हेंबर रोजी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून रांगीचे पोलीस पाटील रामचंद्र काटंगे उपस्थित होते. यावेळी काटंगे यांनी आपल्या मनोगतातून भगवान बिरसा मुंडा यांच्या सामाजिक कार्याची आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी माजी सरपंच फुलेश्वरी गेडाम, माजी उपसरपंच नूरज हलामी, दिनेश चापले, राकेश कोरम, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्चना मेश्राम, शशिकला मडावी, देवा कुनघाडकर, भास्कर भोयर, ग्रामपंचायत कर्मचारी नामदेव बैस, दीपक कुकुडकर, रविंद्र हलामी, रोजगार सेवक अरुण चापडे, नितेश गेडाम, लीलाताई कन्नाके तसेच मोबिलायझर मंदाबाई वालदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक कार्य आणि योगदानाचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here