
नविरांगीतील तीन कर्मचाऱ्यांचा नाट्यप्रयोगादरम्यान सन्मान
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ११ : तालुक्यातील नविरांगी येथे ९ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘विध्वंस संसाराचा’ या नाट्यप्रयोगादरम्यान गावातील तीन कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला.
यावेळी पालघर जिल्ह्यातील सोन्शीव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकपदी नव्याने निवड झालेले नितीन कावळे, झारखंड राज्यातील देवघर येथे नर्सिंग ऑफिसर म्हणून नियुक्त झालेल्या वैष्णवी जुवारे तसेच पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावरून सेवानिवृत्त झालेले बाबुराव सलामे यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
नवयुवक नाट्यकला मंडळाच्या वतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मानापूर येथील प्राध्यापक अशोक जुवारे होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, गडचिरोलीचे सभापती शशिकांत साळवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिक्षक जयंत कांटेंगे, केंद्रप्रमुख संदीप जुवारे, सेवानिवृत्त शिक्षक तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुळशीराम भुरसे, दिवाकर भोयर, माजी सरपंच प्रदीप गेडाम, उपसरपंच नुरज हलामी, दिनेश चापळे, विलास बोगा, ठूमराज कुकडकार, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, माजी उपसरपंच नरेंद्र भुरसे, शिक्षक गडपायले यांच्यासह नवयुवक नाट्यकला मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मिळविलेले यश आणि केलेल्या सेवेचा गौरव करण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Dhanora #Navirangi #CulturalProgram #EmployeeFelicitation #Theatre













