मॅजिक अध्ययन केंद्रात प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; १५ नोव्हेंबर अंतिम मुदत

11

मॅजिक अध्ययन केंद्रात प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; १५ नोव्हेंबर अंतिम मुदत
– गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दोन वर्षे मोफत निवास, भोजन आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
The गडविश्व
ता. प्र/ चिमूर, दि. ०१ : आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ब्राईट एज फाउंडेशनच्या मॅजिक अध्ययन केंद्राने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवेश परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षे मोफत निवास, भोजन, सुसज्ज वाचनालय आणि अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून १५ नोव्हेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

मॅजिक अध्ययन केंद्रामार्फत मागील सात वर्षांपासून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यंदा उच्च शिक्षण, एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग तसेच केंद्रीय व रेल्वे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

विशेष म्हणजे, आयटीआय (इलेक्ट्रिशियन व वायरमन), दिव्यांग, अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. एससी, ओबीसी आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केवळ उच्च शिक्षण व एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठीच नोंदणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी आहे नोंदणी प्रक्रिया

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.brightagefoundation.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी. अर्ज भरण्यापूर्वी गुगल फॉर्ममधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ एकदाच नोंदणी करावी. नोंदणीसाठी १५० रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागणार असून, त्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट संपूर्ण नावासह संबंधित मोबाईल क्रमांकावर पाठवावा.

गुगल फॉर्ममध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप लिंकद्वारे अधिकृत ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतरच अर्ज सबमिट करावा. प्रवेश परीक्षा आणि पुढील प्रक्रियेची माहिती याच व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणार आहे. केवळ आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनीच या प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

ऑनलाइन नोंदणी लिंक :
www.brightagefoundation.in

नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती :
https://drive.google.com/uc?export=download&id=1s36m5yKU_Hrei5IfZ06hAlAamHv2cvUT

मॅजिक अध्ययन केंद्राची कार्यपद्धती आणि उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेच्या वतीने दोन माहितीपटही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

माहितीपट पाहण्यासाठी :

दुसरा माहितीपट बघण्याकरिता क्लिक करा : 
https://youtu.be/mltqyc1zrPE

अधिक माहितीसाठी वाल्मीक (9370336389) यांच्याशी, तर नोंदणीदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणींसाठी रोशन (9673840138) यांच्याशी संपर्क साधावा, असे ब्राईट एज फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने कळविण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MagicStudyCentre #BrightAgeFoundation #Chandrapur #FreeEducation #CompetitiveExams #MPSCPreparation #UPSCPreparation #PoliceRecruitment #HigherEducation #FreeHostel #FreeFood #StudentAdmission #EntranceExam2026 #ScholarshipOpportunity #EducationForAll

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here