कुरखेडा : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

11

कुरखेडा : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १३ : शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने जंगल परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पुराडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
देवेंद्र तुळशिराम चौधरी (वय ३९), ता. कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शेतात खांडी पाहण्यासाठी गेली होती. यावेळी शेत परिसरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने तिला बळजबरीने उचलून शेतालगतच्या दाट जंगल परिसरात नेले. तेथे तिच्यावर जबरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पीडितेच्या तोंडी रिपोर्टवरून पुराडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ६५ (१), ७४, ७६ भा.न्या.सं. २०२३ तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ७ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पुराडा पोलीस करीत असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here