सुंदर माझी शाळा’ अभियानाला फळबागेची जोड; धानोरा तालुक्यात १० शाळांमध्ये वृक्षलागवडीचा शुभारंभ

2

सुंदर माझी शाळा’ अभियानाला फळबागेची जोड; धानोरा तालुक्यात १० शाळांमध्ये वृक्षलागवडीचा शुभारंभ
– मरकेगाव शाळेत गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे यांच्या हस्ते शुभारंभ, तीन वर्षे संगोपनाची जबाबदारी
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १२ : ‘विकसित भारत–जी राम जी’ योजनेअंतर्गत ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत धानोरा तालुक्यातील १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची फळबाग लागवडीसाठी निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ धानोरा केंद्रांतर्गत ग्रामपंचायत तुकूम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरकेगावच्या प्रशस्त पटांगणात गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे यांच्या हस्ते वृक्षलागवड करून करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत प्रशासक सुमित्रा तोफा, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर हलामी, गाव पाटील अर्जुन तोफा, पोलीस पाटील केसरी तोफा, विस्तार अधिकारी (कृषी) प्रभाकर कीलनाके, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय वायबसे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी देवानंद जनबंधू, स्थापत्य अभियंता राकेश चलाख, तांत्रिक अधिकारी प्रभाकर सातपुते यांच्यासह शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, महिला, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या १० शाळांमध्ये फळबाग फुलणार

‘सुंदर माझी शाळा’ आणि ‘जी राम जी’ अंतर्गत फळबाग लागवडीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंढरी, रेचा, मुरूमगाव, येरकड, जपतलाई, मरकेगाव, गट्टेपायली, महावाडा-२, जांभळी आणि सुरसुंडी या १० शाळांची निवड करण्यात आली आहे.
प्रत्येक शाळेच्या परिसरात किमान १०० फळझाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत आंबा, चिकू, बोर, जांभूळ, पेरू यांसह विविध फळझाडांची लागवड केली जाणार आहे. लागवडीनंतर पुढील तीन वर्षे या फळबागेचे संगोपन व देखभाल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा परिसर हिरवाईने नटण्यासोबतच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here