गडचिरोली ते केदारनाथ १८४३ किमींची सायकलवारी ; निलेश गुरुनुलेचा सायकल स्नेही मंडळातर्फे होणार सन्मान

122

गडचिरोली ते केदारनाथ १८४३ किमींची सायकलवारी ; निलेश गुरुनुलेचा सायकल स्नेही मंडळातर्फे होणार सन्मान
– १३ दिवसांत जिद्दीचा प्रवास पूर्ण; १३ ऑगस्टला वसंत विद्यालयात सन्मान सोहळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : गडचिरोली ते केदारनाथ धाम असा तब्बल १८४३ किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या १३ दिवसांत पूर्ण करणारे हनुमान वॉर्डातील वृत्तपत्र वितरक निलेश विलास गुरुनुले यांच्या जिद्दीला आता सन्मानाची दाद मिळणार आहे. सायकल स्नेही मंडळ, गडचिरोलीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निलेश गुरुनुले यांनी पूर्ण केलेली ही सायकलवारी युवकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता वसंत विद्यालय, गडचिरोली येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांना सायकल भेट देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, सायकलप्रेमी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निलेश गुरुनुले यांच्या जिद्दीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सायकल स्नेही मंडळाचे जिल्हा सरचिटणीस उदय धकाते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here