रोजगार सहाय्यक स्व. ज्ञानेश्वर पुराम यांच्या कुटुंबाला २० हजारांची मदत

5

रोजगार सहाय्यक स्व. ज्ञानेश्वर पुराम यांच्या कुटुंबाला २० हजारांची मदत
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०९ : ग्रामपंचायतीत अत्यल्प मानधनावर रोजगार हमीची कामे प्रामाणिकपणे पार पाडत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे रोजगार सहाय्यक स्व. ज्ञानेश्वर पुराम (रा. चांदागड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद प्रसंगी कुटुंबाला आधार देण्यासाठी ग्रामपंचायत रोजगार सहाय्यक संघटना, तालुका कुरखेडा यांच्या वतीने २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
स्व. ज्ञानेश्वर पुराम यांनी रोजगार सहाय्यक म्हणून बजावलेल्या प्रामाणिक सेवेचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करत सहकाऱ्यांनी स्वखुशीने आर्थिक योगदान देत सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी पंचायत समिती कुरखेडा येथील रविजी राऊत, तहसील कार्यालयातील देवीदास राऊत, विश्वबोधी कराडे, ग्राम रोजगार सेवक संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष मंगेश फुकटे, नेताजी राऊत, ग्रामपंचायत अधिकारी बनसोड, प्रशासक चुरगाये, ग्रामपंचायत सदस्य धुर्वे, माजी तंटामुक्त अध्यक्ष मेश्राम, तंटामुक्त अध्यक्ष जुमनाके, वर्षाताई पुराम, ग्रामपंचायत रोजगार सहाय्यक संघटनेचे तालुकाध्यक्ष जालंदर बोदेले, मुंशीलाल लाडे, चंद्रशेखर मेश्राम, विनोद नागपूरकर, रोशन सय्यद, नितेश मुरकुटे, रवींद्र मारगाये, भास्कर झोडे, सचिन साहरे, आकाश लोणारे यांच्यासह तालुक्यातील रोजगार सहाय्यक संघटनेचे सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी शामराव कांबळी उपस्थित होते.
संकटकाळात सहकाऱ्यांनी पुढे येत केलेल्या आर्थिक मदतीमुळे पुराम कुटुंबाला मोठा आधार मिळाला. संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here