लॉईड्स मेटल्सच्या शैक्षणिक उपक्रमातून ८३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

55

लॉईड्स मेटल्सच्या शैक्षणिक उपक्रमातून ८३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
The गडविश्व
कोणसरी, दि. २६ : शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल, कोणसरी येथे मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शालेय सहाय्यता कार्यक्रमांतर्गत इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वीतील ८३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला बळकटी देणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूल, कोणसरीचे मुख्याध्यापक कोहाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे प्रशासन विभागप्रमुख बेणूगोपाल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला.
यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here