मुरुमगावात मुख्य रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी; चिखलामुळे वाहनचालकांची कसरत

9

मुरुमगावात मुख्य रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी; चिखलामुळे वाहनचालकांची कसरत
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २२ : महाराष्ट्र–छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर मुरुमगाव येथील ग्रामसचिवालयासमोरील बसस्थानक परिसरात मंगळवारी दुपारी ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. ऐन वर्दळीच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी ट्रक थांबल्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सीजी-17-एलए-7226 क्रमांकाचा ट्रक धानोरा येथून येत असताना मुरुमगावात अचानक बंद पडला. ट्रक रस्त्याच्या मध्यभागीच उभा राहिल्याने दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
ट्रक चालक व मालकाशी संपर्क साधला असता, ट्रकच्या दुरुस्तीचे काम सुरू असून रात्री उशिरापर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सततच्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून जड वाहनांच्या वर्दळीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here