आंधळी सोनपूर येथे ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रम उत्साहात

15

आंधळी सोनपूर येथे ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रम उत्साहात
– बुद्ध व डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : आंधळी सोनपूर येथे सम्यक समृद्ध बौद्ध समाजाच्या वतीने तथागत आणि परमपूज्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यानिमित्त ‘जागर संविधानाचा’ या युवा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये होते, तर उद्घाटन संकल्प फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. जगदीश बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बंडूजी मैशाखेत्री, राऊत साहेब, पोलीस पाटील मडावी, उपसरपंच चौधरी, तुकारामजी मडावी, योगेंद्रजी कराडे, बाळकृष्ण नखाते, राजू बावनथडे, जनार्दन हरामी, दक्षता कराडे, विनोद मडावी, रवींद्र ताराम, मिलिंद चौधरी, गौतम कराडे, तुकाराम मारगाये, रमेश बडोले, लालाजी घोरमडे, मनसाराम काटेंगे, भानारकर, सोनू चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष चांगदेव फाये व डॉ. जगदीश बोरकर यांनी संविधानाच्या मूल्यांची जपणूक, सामाजिक ऐक्य आणि युवकांच्या प्रबोधनाची गरज अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद मडावी सर यांनी केले, तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरज गावतुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सम्यक समृद्ध बौद्ध समाजाचे अध्यक्ष देवेंद्र चौधरी, खुशाल भैसारे, भीमराव कराडे, विवेक चौधरी, राहुल चौधरी, प्रवीण चौधरी, अरुण सांगोळे, दीपक चौधरी, लीलाधर भैसारे, धनराज सांगोळे, सचिन सांगोळे, स्नेहलता जनबंधू, सोनू चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
संविधान जागृती व सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here