कुरखेडा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न

195

कुरखेडा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘समस्त शिवभक्त परिवार’च्या वतीने १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान भव्य शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. तीन दिवस शहरात भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजर आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पहिल्या दिवशी बालक व युवकांसाठी वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी भव्य दिंडी-पालखी सोहळा काढण्यात आला. पावनखिंडीच्या युद्धाचा तसेच संभाजी महाराज यांच्या वीरमरणाचा प्रभावी देखावा सादर करण्यात आला. समारोपाच्या दिवशी ऐतिहासिक नाट्यप्रयोग आणि अफझलखान वधाचा प्रसंग रंगविण्यात आला.
उत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली. शिवरायांचा पराक्रम व स्वाभिमान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here