धानोरा येथे ‘पेन्शन अदालत’ : सेवानिवृत्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

55

धानोरा येथे ‘पेन्शन अदालत’ : सेवानिवृत्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १६ : धानोरा पंचायत समिती येथे शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 12 वाजता तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘पेन्शन अदालत’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती धानोरा येथील गटविकास अधिकारी रोशन कुमार दुबे यांनी भूषविले. यावेळी कक्ष अधिकारी अर्चना हेमके, लेखा अधिकारी तेलतुमंडे, कनिष्ठ सहाय्यक धोटे, कवाडघरे, देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच तालुका शाखा अध्यक्ष मुबारक अली सय्यद, सचिव लालाजी उशेंडी, पि. के. घुगुसकर, दिनकर नरोटे, भुरसे, देवनाथ मशाखेत्री, दामाजी उसेंडी, देविदास उईके, तुकाराम उसेंडी, बाजीराव पदा, चिंचोकर, अशोक कोल्हटकर, दशरथ गावंडे, अंकर शहा मडावी, सेवानता हलामी, भगवान मशाखेत्री आदींसह संघटनेचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अदालतीदरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणातील विलंब, कागदपत्रांची पूर्तता, आर्थिक तफावत, वैद्यकीय भत्ते तसेच इतर प्रशासकीय अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रकरण ऐकून घेत सकारात्मक भूमिका मांडली.
चर्चेअंती गटविकास अधिकारी रोशन कुमार दुबे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पेन्शन अदालत उपक्रमामुळे सेवानिवृत्तांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here