नागेपल्ली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्सचा दणदणीत विजय

16

नागेपल्ली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्सचा दणदणीत विजय
The गडविश्व
अहेरी, दि. १० : नागेपल्ली येथे आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्स स्पोर्ट्स संघाने दमदार व सातत्यपूर्ण कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विविध प्रदेशांतील बलाढ्य संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यांमुळे ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी थरारक ठरली.
या स्पर्धेत लॉयड्स मेटल्ससह जबलपूर, खम्मम (तेलंगणा), गडिकुटम (तेलंगणा), चंद्रपूर व अमादा पल्ली येथील एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला होता. सर्व संघांनी उच्च दर्जाचे खेळकौशल्य सादर केल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली.
थरारक अंतिम सामन्यात लॉयड्स मेटल्स संघाने जबलपूर संघाचा २–१ असा पराभव करत चॅम्पियनशिपवर आपली मोहोर उमटवली. जबलपूर संघ उपविजेता ठरला, तर चंद्रपूर संघाने तिसरे स्थान पटकावले.
या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेस माजी राज्यमंत्री व पालकमंत्री श्रीमंत राजे अंबरीशराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राणी रुख्मिणीदेवी आत्राम यांनी भूषवले, तर अवधेशरावबाबा आत्राम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचे महत्त्व अधिकच वाढले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल लॉयड्स मेटल्स संघाला ५०,००० चे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
हा विजय लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीमधील शिस्तबद्ध प्रशिक्षण, खेळाडूंचे समर्पण व प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे बोलले जात आहे. तळागाळात मजबूत क्रीडा संस्कृती निर्माण करत तरुण खेळाडूंना उच्च स्तरावर संधी देण्याची लॉयड्स मेटल्सची बांधिलकी या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here