कुरखेडा : चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
– नान्ही फाट्यानजीक भीषण अपघात
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि.०९ : कुरखेडा–गेवर्धा मार्गावरील नान्ही फाट्यानजीक शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गेवर्धा येथील हॉटेल व्यावसायिक राजूल्लाह खां पठान (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.
धडकेनंतर राजूल्लाह खां पठान रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ त्यांना रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रविवारी सकाळी रुग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे गेवर्धा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कुरखेडा पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













