गडचिरोली : जिल्हा सीमेलगत चकमकीत माओवादी ठार, एक जवान जखमी
– घटनास्थळावरून एके-४७, एसएलआर जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : नारायणपूर–गडचिरोली जिल्हा सीमेवरील जंगलात सुरक्षा दल व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका पुरुष माओवादीचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून एके-४७ व एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे.
३ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या नेतृत्वाखाली सी-६० पथकांनी फोदेवाडा परिसरात शोधमोहीम सुरू केली.
काल दिवसा या अभियानादरम्यान माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. आज सकाळी अतिरिक्त सी-६० व सीआरपीएफ क्यूएटी पथक दाखल झाल्यानंतर आणखी चकमक उडाली. दरम्यान, माओवाद्यांच्या गोळीबारात सी-६० पथकातील एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बाहेर काढण्यात येत आहे.
परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली असल्याची माहिती आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxal #encounter














