रांगी येथे २० जणांचे रक्तदान : समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शिबीर यशस्वी

40

रांगी येथे २० जणांचे रक्तदान : समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शिबीर यशस्वी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत येथे दिनांक १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रक्त संक्रमण टीम, गडचिरोली व ग्रामपंचायत रांगी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या सामाजिक भावनेतून ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. केलेले रक्तदान भविष्यात एखाद्या रुग्णाचा अमूल्य जीव वाचविण्यास उपयोगी ठरणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम (गडचिरोली), सौ. फालेश्वरी गेडाम (सरपंच, ग्रा.पं. रांगी), नुरज हलामी (उपसरपंच), सौ. शशिकला मडावी, सौ. वछलां हलमी, दिनेश चापले, राकेश कोरम, शांताराम बरडे, तुळशीराम भुरसे, प्रदीप गेडाम, काटेंगे (मु. जि. प. शाळा), देवराव कुनघाडकर, मकरंद बांबोडे (ग्रामपंचायत अधिकारी) यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. साहू, समता खोब्रागडे मॅडम व त्यांची वैद्यकीय टीमने रक्तसंकलनाची प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पाडली.
रक्तदान करणाऱ्यांमध्ये सोहेल शमिरखा पठाण, अनिल मार्गे, नितेश गेडाम, हेमंत काटेंगे, विकास दोडके, प्रमोद कन्नाके, सिमरन कांबळे, आकाश मेश्राम, उमेश वासनिक, मकरंद बांबोडे, यशपाल टेंभूने, अनिकेत बैस, मडावी पटवारी, योगेश चंदनखेडे, अभिलाष ताडाम, नुरज हलामी, राजेंद्र कुमोटी, दीपक कुकडकार, जावेद सय्यद व राहुल कोल्हे यांचा समावेश आहे.
रक्तदात्यांना जिल्हा रक्त संक्रमण कार्यालयाकडून प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत रांगी यांच्या वतीने नाश्ता व फळांची व्यवस्था करण्यात आली. सामाजिक जाणीव जपणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here