कुरखेडा येथील सेवानिवृत्त सैनिक नामदेवराव बनपूरकर यांचे दुःखद निधन

83

कुरखेडा येथील सेवानिवृत्त सैनिक नामदेवराव बनपूरकर यांचे दुःखद निधन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : आझाद वार्ड, कुरखेडा येथील निवासी, भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक तथा प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिक नामदेवराव पीसारामजी बनपूरकर यांचे आज पहाटे सुमारे ४.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुरखेडा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
देशसेवेसाठी आयुष्याचा महत्त्वाचा काळ भारतीय सैन्य दलात घालवून निवृत्तीनंतरही समाजकार्य, व्यवसाय आणि सामाजिक सलोखा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बनपूरकर परिचित होते. त्यांच्या शांत, संयमी व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे ते सर्वत्र आदराने ओळखले जात होते.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी सुमारे १ वाजता सती नदीच्या घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरातील सामाजिक, व्यावसायिक व माजी सैनिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here