नगरपरिषद निवडणुकीनिमित्त २ डिसेंबरला गडचिरोलीत सार्वजनिक सुट्टी
– आरमोरी, देसाईगंज व गडचिरोली नगरपरिषद मतदारसंघांसाठी लागू
The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगरपरिषद मतदारसंघांमध्ये — आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली मध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या २६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित राजपत्रात याबाबत अधिसूचना जाहीर झाली.
ही सुट्टी केवळ संबंधित क्षेत्रातील मतदारांसाठीच नव्हे, तर कामानिमित्त आपल्या मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. निवडणुकीत मतदारांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
सुट्टीदरम्यान केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका तसेच अन्य शासकीय संस्थांनाही सुट्टी लागू असेल, असेही राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
२ डिसेंबरला मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #PublicHolidayForVoting #GadchiroliElections2025 #MunicipalPolls2025
#VotingDayDec2 #ElectionUpdate #DemocracyInAction














