चोपमध्ये दुर्गा उत्सवाची धूम : गरबा, भजन, रक्तदान व शिव तांडवाचा जल्लोष
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. १८ : तालुक्यातील चोप येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यंदाही भव्य दुर्गा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान गांधी चौक येथे हा सोहळा पार पडणार आहे. धार्मिक विधींनिशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सामाजिक उपक्रमांची जोड यामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
२४ व २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता रंगणाऱ्या गरबा स्पर्धेत प्रथम विजेत्यास रु. १०,००१/-, द्वितीयस ७,००१/- तर तृतीयस ४,००१/- अशी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तर २७ व २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भजन स्पर्धेत भक्तिरसाची मैफिल सजणार असून प्रथम क्रमांक विजेत्यास रु. १०,००१/- चे बक्षीस देण्यात येणार आहे.
धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबत समाजहिताचाही विचार मंडळाने केला असून ३० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे उत्सवाला सामाजिक अधिष्ठान लाभणार आहे.
याच दिवशी उज्जैन (म.प्र.) येथील युवा महाकाल की झांकी मंडळाचे शिव तांडव सादरीकरण होणार असून भाविकांना अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती मिळणार आहे. हा कार्यक्रम उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, गांधी चौक, चोप यांनी तयारी अंतिम टप्प्यात आणली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 8999161652, 7030626884, 8459063045 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #desaiganj #durgautsav












