कुरखेडा येथे १०७ निरंकारी अनुयायांचे रक्तदान

60

कुरखेडा येथे १०७ निरंकारी अनुयायांचे रक्तदान
– संत निरंकारी मंडळाचा पुढाकार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १७ : संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा कुरखेडाच्या वतीने आज संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात एकूण १०७ निरंकारी अनुयायी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. यामध्ये दोन महिला अनुयायिनींचाही समावेश होता.
गेल्या सलग १४ वर्षांपासून कुरखेडा येथे नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. निरंकारी मिशनचे प्रमुख संत हरबच्चनसिंगजी महाराज यांनी हौतात्म्य पत्करल्याच्या पार्श्वभूमीवर, “रक्ताचा बदला रक्ताने नव्हे तर रक्तदान करून घ्या” हा संदेश संत हरदेवसिंग महाराजांनी दिला होता. त्यानुसार सन १९८६ पासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. अनुयायी आजही या शिकवणीचे पालन करीत महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात.
आजच्या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी झोनल इंचार्ज किशन नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रीय संचालक हरिष निरंकारी, शाखा प्रमुख माधवदास निरंकारी, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, काँग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील, न. प. उपाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शिबिरासाठी गडचिरोली रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. नागेश शाहू, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, डॉ. प्राजक्ता दुपारे, तंत्रज्ञ व परिचारिका यांची टीम कार्यरत होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सेवादल संचालक दिलीप निरंकारी, शिक्षक अजय पूस्तोडे यांच्यासह सर्व सेवादल स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here