मुरूमगाव ग्रा. प. तर्फे जि. प. शाळेला साउंड सिस्टीम सुविधा उपलब्ध

127

मुरूमगाव ग्रा. प. तर्फे जि. प. शाळेला साउंड सिस्टीम सुविधा उपलब्ध
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. १७ : तालुक्यातील मुरुमगाव ग्रामपंचायतीच्या अनुदानातून जि. प. उच्च. प्रा. केंद्र शाळेला साउंड सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नव्याने गठीत शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीवरून ही सुविधा पुरविण्यात आली असून, यामुळे शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपयुक्त भौतिक सुविधा निर्माण झाल्या आहेत.
या अनुषंगाने शाळा प्रांगणात वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खेमराज खोब्रागडे व मुख्याध्यापिका गायत्री खेवले यांना साउंड सिस्टीम साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शंकर कुमरे, उपाध्यक्ष प्रकाश उसेंडी, ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेश्राम, राजेंद्र कोठवार, मैदमवार, शिवनाथ टेकाम, केंद्रप्रमुख अरुण सातपुते, चंदुदास रामटेके, जगदीश बावणे, रुपेश शिवणकर, संगीता भडके, रविता शेडमाके, सुमन किरंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here