जिल्हा क्रीडा स्पर्धेत जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा अव्वल

92

जिल्हा क्रीडा स्पर्धेत जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा अव्वल
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या वतीने आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेत जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोराच्या संघाने उत्तम खेळ कौशल्य दाखवत बेसबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात गडचिरोलीतील गोंडवाना सैनिक विद्यालय व जे.एस.पी.एम. महाविद्यालय यांच्यात चुरशीची लढत झाली. रोमांचक झालेल्या या सामन्यात गोंडवाना सैनिक विद्यालयावर मात करून जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा संघाने विजय मिळवला. या यशामुळे विभागीय स्तरावर स्पर्धेत धानोरा तालुक्याचे नेतृत्व करण्याचा मान या संघाला मिळाला आहे.
संस्थेचे नाव उंचावल्याबद्दल श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थाच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, संस्थेच्या सचिव सौ. मिलन ऋषीं सहानी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल व सर्व प्राध्यापकांनीही संघाचे अभिनंदन करून विभागीय स्तरावरील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य डॉ. उदय थुल यांनी पुष्पगुच्छ देऊन खेळाडूंचा सत्कार केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here