धानोरा : बोगस डॉक्टरवर एफआयआर दाखल

1031

– आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील जांभळी गावात वैद्यकीय पात्रता नसताना बेकायदेशीरपणे उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरविरोधात पोलिस आणि आरोग्य विभागाने कठोर कारवाई करत एफआयआर दाखल केला आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
तालुका आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून २८ जुलै २०२५ रोजी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ही धानोरा तालुक्यातील अशा स्वरूपातील पहिली कारवाई मानली जात असून, बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
संयुक्त पथकात पोलीस उपनिरीक्षक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी होते. तपासणीदरम्यान संबंधित व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना गावात रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले. हा प्रकार आरोग्य कायद्याचे सरळसरळ उल्लंघन असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेमुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला असून, अशा फसव्या डॉक्टरांना उघडकीस आणण्यासाठी शोधमोहीम सुरूच ठेवली जाणार आहे. नागरिकांनी अशा बनावट उपचार केंद्रांपासून सावध राहून अधिकृत व पात्र वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #FakeDoctor #IllegalMedicalPractice #HealthDepartment #PoliceAction #JointOperation #PublicHealthSafety #MedicalFraud #बोगसडॉक्टर #आरोग्यविभाग #संयुक्तकारवाई #गडचिरोलीपोलीस #धानोरा #वैद्यकीयफसवणूक #आरोग्यसुरक्षा #बेकायदेशीरउपचार #गुन्हेगारीकारवाई #जनतेच्यारोग्यासाठी #बनावटडॉक्टरांविरोधात #जाणतेसावध #गावातबोगसडॉक्टर #गडचिरोलीवृत्त #बोगसउपचारांवरकारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here