ई-पॉस प्रणालीतूनच अनुदानित खत विक्री अनिवार्य
– १० ऑगस्टपर्यंत L1 मशीन अद्ययावत करण्याचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ जुलै : जिल्ह्यातील सर्व रसायनिक खत विक्रेत्यांसाठी अनुदानित खत विक्रीसाठी ई-पॉस (e-PoS) प्रणालीचा वापर आता सक्तीचा करण्यात आला आहे. खताच्या वितरणात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी कृषी विभागाने ही महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठ्यात तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.
अनुदानित खताची विक्री केवळ ई-पॉस प्रणालीद्वारेच करण्याचा आदेश असून, विक्रीची नोंद iFMS प्रणालीत त्वरित आणि अचूकपणे व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना नियमित तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
ई-पॉस प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये विसंगती आढळल्यास विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असून, त्यांचा परवाना नूतनीकरण नाकारला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, L1 सुरक्षा मानक असलेल्या अद्ययावत ई-पॉस मशीनच्या वापरासाठी १० ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्याप जुनी किंवा अप्रामाणित यंत्रणा वापरणाऱ्या विक्रेत्यांनी तातडीने जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या या नव्या कार्यपद्धतीमुळे खत वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, प्रभावी आणि शेतकरी हिताची होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews #ePoS #FertilizerDistribution #AgricultureDepartment #SubsidizedFertilizer #DigitalAgriculture #L1Security #FertilizerSales #GadchiroliAgriculture #SmartFarming #AgriReforms #FertilizerMonitoring #eGovernance #AgriCompliance #AgriDealers #iFMSSystem
#ईपॉसप्रणाली #खतविक्री #अनुदानितखत #कृषिविभाग #डिजिटलकृषी #स्मार्टशेती #गडचिरोलीकृषी #खतनियंत्रण #खतव्यवस्था #शेतकरीहित #कृषीपरिवर्तन #एल1सुरक्षा #खतनियमन #परवाना नियंत्रण #iFMSप्रणाली
