मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी काँग्रेसकडून ‘लालीपॉप-चॉकलेट वाटप’ आंदोलन

45

The गडविश्व
गडचिरोली, दि.१९ : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने अनोख्या आंदोलनाचे आयोजन केले आहे. “विकासाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात ‘लालीपॉप व चॉकलेट वाटप आंदोलन’ राबवण्यात येणार आहे,” अशी माहिती काँग्रेसने दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले असून, प्रत्यक्षात कोणताही ठोस बदल घडवून आणलेला नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील नागरिक आजही विविध समस्यांनी त्रस्त असून त्या बाबत मुख्यमंत्री किंवा शासनाची कोणतीही गंभीर भूमिका दिसून आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवशी २२ जुलै रोजी दुपारी १ वाजता काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे समस्याग्रस्त नागरिकांना लालीपॉप व चॉकलेटचे वाटप करण्यात येणार आहे.
या आंदोलनात रानटी हत्ती व पुरामुळे बाधित शेतकरी, विद्युत मीटरपासून वंचित शेतकरी, कर्जमाफी व बोनसच्या प्रतीक्षेत असलेले लाभार्थी, घरकुलधारक, बेरोजगार तरुण, रोजगाराच्या नावाने फसवणूक झालेल्या आदिवासी युवकांचा समावेश राहणार आहे. तसेच बंद शाळांमुळे शिक्षणहक्कापासून वंचित विद्यार्थी, एसटी वाहतूक व्यवस्थेअभावी अडचणीत सापडलेले नागरिक, अपूर्ण पदभरती, जलसंकट, अपघातग्रस्तांचे प्रश्न, वृक्षतोड व औद्योगिक प्रकल्पांमुळे झालेल्या अन्यायग्रस्तांचा आवाज या आंदोलनातून उठवण्यात येणार आहे.
काँग्रेसने हे आंदोलन सरकारच्या खोट्या विकासदाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले असून, “वाढदिवशी केवळ केक नव्हे, तर जनतेच्या व्यथांचा आरसा दाखवू,” असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #LollipopProtest #ChocolateSymbolism #CMBirthdayProtest #CongressAgitation #FalsePromises #DevelopmentMyth #PoliticalSatire #FadnavisBirthday #GadchiroliStruggles #गडचिरोली #लालीपॉपआंदोलन #चॉकलेटप्रतीक #मुख्यमंत्रीवाढदिवस #काँग्रेसविरोध #विकासाच्या_थापा #जिल्ह्याच्या_व्यथा #राजकीयउपहास #FadnavisBirthdayProtest #GadchiroliCongress

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here