– ९ जण अटकेत, धानोरा पोलिसांची कारवाई
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २४ : तालुक्यातील मोडेभट्टी (तुलावी टोला) येथील जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध कोंबडा बाजारावर धानोरा पोलिसांनी धाड टाकून ८ लाख ६७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई २२ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे टाकण्यात आली. मोहली परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की मोडेभट्टीजवळील डोंगराळ भागात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा जुगार सुरू आहे. त्वरित कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कोंबड्यांच्या झुंजीसह सुरू असलेला जुगार उघडकीस आणला.
कारवाईदरम्यान मनोज भैसारे (थोटेबोडी), विजय देशमुख (रांगी), महेश वाते (खार्डी), जमीर शेख (गोकुळ नगर), संदीप मेश्राम (रांगी), सारंग सेलोटे (मरेगाव), निरंजन राऊत (थोटेबोडी), सचिन (खुरसा), शिवा सिंह (गडचिरोली) या ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी ६ कोंबडे, ७ दुचाकी, १ चारचाकी वाहन आणि रोख रक्कम असा एकूण ८,६७,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमित चेवले, पोलीस हवालदार भजन गावडे, जनेरसिंग उसेंडी, शिपाई मनोज दुगा, प्रवीण राऊत, चंद्रशेखर मैंद, प्रवीण गौड, विनायक मडावी, मोरेश्वर पोटावी, पुरुषोत्तम येलमुले, अमित आदींच्या पथकाने केली.
या धाडीनंतर परिसरातील अवैध कोंबडा बाजार भरवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanoranews #crimenews #PoliceRaid #IllegalGambling #CockfightRaid #DhanoraNews #GamblingBust #CrimeNews #867KSeized #GadchiroliUpdate #CockfightCrackdown #PoliceAction