– नागरी समस्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली नगरपरिषद कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्या, विविध विकासकामे आणि मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार डॉ. किरसान यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत निर्देश देत, “नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवा,” असा ठाम संदेश दिला.
बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, काँग्रेस शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, जिल्हा उपाध्यक्ष समशेर पठाण, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, सुनील डोंगरा, गुलाब मडावी, तसेच प्रभाकर वासेकर, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, रुपेश टिकले, सुरेश भांडेकर, संजय मेश्राम, रामकृष्ण ताजने, समीर ताजने, माजित सय्यद, गौरव येनप्रड्डीवार, जावेद खान, कुणाल ताजने, लता मुरकुटे, कल्पनाताई नंदेश्वर, रिता गोवर्धन यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत घरकुल योजनेंतर्गत अतिक्रमण भागात वास्तव्यास असलेल्या गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी यंत्रणा बळकट करण्याची गरज व्यक्त झाली. स्वच्छता मोहिमा, नियमित नालीसफाई, कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि मंजूर विकासकामांमध्ये गुणवत्तेचा दर्जा राखण्यावर खासदारांनी भर दिला.
“शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधा उन्नत करणे ही प्राथमिकता आहे. जनतेच्या समस्या ऐकून घेऊन तात्काळ उपाययोजना व्हायला हवी. यामध्ये प्रशासन आणि जनतेचा परस्पर सहभाग महत्त्वाचा आहे,” असे सांगत खासदार डॉ. किरसान यांनी प्रशासनाला वेळेवर आणि ठोस निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
बैठकीत नागरिकांनी थेट अडचणी, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. या संवादात्मक पद्धतीमुळे प्रशासन व जनतेमध्ये विश्वासाचे नाते बळकट होत असून, शहर विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #gadchiroli)