कुरखेडा : दुचाकी घसरून अपघात, एक ठार, एक जखमी

1140

– तळेगाव–मोहगाव रस्त्यावर भीषण दुर्घटना
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा ( चेतन गहाणे), दि. १३ : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार, तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. ही दुर्घटना कुरखेडा तालुक्यातील तळेगाव–मोहगाव मार्गावर घडली. दुचाकी चालक हा दारूच्या नशेत असल्याचे समजते.
या अपघातात रोशन मिसार (वय २६, रा. कुरखेडा) याचा मृत्यू झाला असून, विकी कल्लो (वय २५) हा किरकोळ जखमी झाला आहे. तिसरा मित्र मिंटू तुलावी हा दुचाकीवर बसण्यास नकार देत तळेगावातच थांबल्यामुळे अपघातातून बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र तळेगाव येथे लग्नकार्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. कार्यक्रमानंतर तळेगाव येथून मोहगावकडे जात असताना, होंडा शाईन (क्रमांक MH 33 AG 8870) या दुचाकीवरील चालक रोशन मिसार याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात रोशनचा जागीच मृत्यू झाला.
जखमी विकी कल्लो याच्यावर उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #accident )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here