गडचिरोली : अवैध दारु व चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त

807

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून अवैध दारु व चारचाकी वाहनासह सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई ६ मार्च रोजी करण्यात आली. या प्रकरणी गोलु मंडल (वय ३२), रा. कुनघाडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली, गणेश नरेंद्र नैताम, (वय २२), व्यवसाय-वाहन चालक, नीरज किरण भुर्रे, (वय १८ ), दोघेही रा. गोकुलनगर, ता. जि. गडचिरोली, याचे विरुध्द कलम 65 (अ), 83, 98 (2) महा.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर गोलु मंडल (वय३२), रा. कुनघाडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली, ता. जि. गडचिरोली हा फरार असून त्याचा शोध घेणे सुरु आहे.
जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. गोलु मंडल हा अवैध रित्या आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून पो. स्टे. चामोर्शी हद्दीत वाहतूक करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि. राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करून चामोर्शीच्या पश्चिमेस 02 कि.मी. येथे सापळा रचून एका चारचाकी वाहनास थांबवुन चौकशी केली असता चार लाख रुपयांची देशी विदेशी दारू आढळून आली. सदर दारू व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एम. एच. ४९ बी.बी.२६२७ क्रमांकाची वाहन किंमत तीन लाख रुपये असा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोस्टे चामोर्शी येथे गुन्ह्राचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे आणि चापोअं/माणिक निसार यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here