धानोरा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थाचे तहसीलदारांना निवेदन

244

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.१३ : तालुक्यातील महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थाचे सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्याचा कार्यकाल वाढविण्याची मागणी धानोरा तालुका संघटनेने मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
मुख्यमंत्री युवा महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व व नाविन्यता विभागाकडून संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तर्फे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना व तरुणींना ग्रामपंचायती, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती व तहसील कार्यालय अशा अनेक विभागात धानोरा तालुक्यात अंदाजे १५० तरुणांना ऑगस्ट २०२४ ला सहा महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती देण्यात आली आणि यामध्ये अनेक बेरोजगार तरुण आपापले कार्य नियुक्ती मिळाल्यावर चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. या प्रशिक्षणार्थी यांच्या कार्यकाल जानेवारी फेब्रुवारी २०२५ ला संपणार असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. कालावधी संपल्यानंतर काय करायचे हाच मोठा प्रश्न निर्माण होनार आहे. तरी या प्रशिक्षणार्थींच्या कार्यकाल वाढविण्यात यावे यासाठी धानोरा तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये धानोरा तालुक्यातील संघटनेचे अध्यक्ष डेव्हिड मेश्राम, उपाध्यक्ष निलेश ठाकरे, सचिव सचिन कुमरे, कोषाध्यक्ष पंकज समर्थ/अक्षय पदा, कार्याध्यक्ष संदीप नंदेश्वर/ मोहित पवार, संघटक कुमारी स्मिता कटंगी, सल्लागार अरुण नेवारे/लीना तुमराम/दिपाली वडे, व इतर सदस्य निवेदन देताना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here