गरोदर मातांची प्रसूती आरोग्य संस्थेमध्येच करा : सीईओ आयुषी सिंह

281

– गृह प्रसुतीत ५० टक्के घट
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयात प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत गर्भवती मातांचे रक्त, लघवी, रक्तदाब, हिमोग्लोबीन, अल्ट्रासाऊंड आदी तपासण्या तज्ञांकडुन केल्या जातात व त्यानुसार वैद्यकीय सल्ला दिला जातो. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील गरोदर मातांनी घ्यावा तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातांची प्रसूती घरी न करता आरोग्य संस्थेमध्येच करण्याचे आवाहन आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. ”

घरी प्रसुतीचे प्रमाण 50 टक्केंनी घटले

सन २०२४ -२०२५ मध्ये (एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत) ५,३५३ प्रसुति आरोग्य संस्थेत करण्यात आलेल्या आहेत तर ५७ प्रसुति घरी झाल्या आहेत. तसेच मागील वर्षी याच कालावधीत (एप्रिल-२३ ते ऑगस्ट-२३ पर्यंत) संस्थात्मक प्रसूती ५९१६ तर घरी झालेल्या प्रसुती ची संख्या १०२ होती.१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ संस्थात्मक प्रसूती १५ हजार ७५६ तर घरी प्रसूती ३०१ होती. एप्रिल ते ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारीची तुलना केली असता चालू सहामाहीत संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढलेले असुन घरी होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण ५० टक्क्यानी कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
आरोग्य विभाग अंतर्गत ५२ प्राथमिक आरोग्य केन्द्र, ३३ प्राथमिक आरोग्य पथक , १२ शहरी आरोग्य मंदिर, २ स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ३७६ उपकेन्द्र , ३ उपजिल्हा रुग्णालय , ९ ग्रामीण रुग्णालय , १ सामान्य रुग्णालय , व १ स्त्री रुग्णालय कार्यान्वित आहेत. जिल्हयात आरोग्य विभागामार्फत जननी सुरक्षा योजना , प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मातृत्व अनुदान योजना व मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर मातांना बुडीत मजुरी अनुदान व तज्ञाचे मार्फतीने गरोदर माता व ० ते ६ महिने वयोगटातील बालकाची आरोग्य तपासणी प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. संस्थात्मक प्रसुतिचे प्रमाण वाढवणेसाठी गरोदर माता ट्रॅकींग, नियंत्रण कक्ष, माता बैठक, माहेर घर योजना, गृहभेट हा पंचसुत्री कार्यक्रम राबविला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

(#thegadvishva #thegdv #gadchirolinews #surjagad #muktipath #gadchirioli # CEO ayushi singh)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here