जारावंडी येथे श्रीराम कोलते यांचा सत्कार

176

The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा जारावंडी येथे गणराज्य दिनाचे औचित्य साधुन पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेचे माजी कर्मचारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असणारे श्रीराम कोलते यांचा त्यांच्या भरीव व अतुलनीय कार्यबद्दल शाळेतर्फ तसेच ग्रामपंचायत जारावंडीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर पालक मेळाव्याचे उद्‌घाटक सपना ताई कोडापे सरपंच जारावंडी, सुधाकर टेकाम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, वासुदेव कोडापे, सुरेश मडावी, योगेश कुमरे, रमेश दुग्गा, यशवंत नरोटे, शाळेचे मुख्याध्यापक बी एम. पंधरे, ए.एम बारसागडे, पी डब्लू. वानखेडे, एम.के गेडाम, एन.बी दुधे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.एम.बारसागडे, तर आभार बी. एन.काटेंगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.आर.राणा, ए.आर भुईभार, एच. बी. गेडाम, रमेश मादरबोईना, राज मुंजम, एम. झेड.आतला, अतुल बोरुले, सी.जी वाघ, लक्ष्मण माने, सुभाष ठाकरे, मनिराम सडमेक, सरोजीन मंडल, दुर्गा कोडापे, मोहूर्ले, समीर केरकरा, निलेश उपराळे, गावडे, सुजाता करमरकर, पंकज रायपुरे व विद्यार्थ्यांनी अथक परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here