सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : भाई रामदास जराते

146

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे.
३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून शेती उत्पादनाला हमीभाव, शिक्षण, नोकरी, रोजगार यासह ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी पायाभूत सुविधांसाठी तोकडी तरतूद करुन गरिबांना गरीब करणारा अर्थसंकल्प मांडला गेला असून या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनतेसाठी अत्यंत निराशाजनक आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here