विद्यार्थ्यांनी, विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकडून केलेला उपक्रम म्हणजे नंदोरी प्रदर्शनी

143

The गडविश्व
भद्रावती, १८ मार्च : विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्यांची कल्पकता वाढवणाऱ्या रचना आपण शिक्षक वर्गानी जर तयार केल्या आणि सर्वांना योग्य संधी दिली तर सृजनशील विद्यार्थी तयार होतील असे प्रतिपादन भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर यांनी केले. ते पंचायत समिती भद्रावती अंतर्गत नंदोरी येथील केंद्रशाळेत घेण्यात आलेल्या प्रदर्शनी दरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले
दरम्यान प्रदर्शनीचे आयोजन विद्यार्थ्यांचे, सूत्रसंचालन विद्यार्थ्यांचे, स्वागतगीत विद्यार्थ्यांचे, प्रदशनीतील मॉडेल विद्यार्थ्यांचे, बघणारे आणि दाखवणारे विद्यार्थी, आभारही विद्यार्थ्यांचेच, असा आगळावेगळा प्रदर्शनी उपक्रम पंचायत समिती भद्रावती अंतर्गत नंदोरी येथील केंद्रशाळेत घेण्यात आला. २०२१-२२ पासून भद्रावती तालुक्यात तालुक्यात १ ते ५ या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सिखे संस्था मुंबई, शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त माध्यमातून टीचर इनोव्हेटर कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमात भाषा आणि गणित विषयाच्या शिकविण्याच्या विविध नाविन्यपूर्ण पद्धतीचे प्रशिक्षण शिक्षकांना दोन टप्प्यात देण्यात आले, त्यानंतर शिक्षकांनी या सर्व पद्ध्ती विद्यार्थ्यांसोबत घेतल्या. विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेत या सर्व पद्धतींवर आधारित मॉड्युल तयार करून कार्यक्रमात प्रदर्शित केले. गावकरी, प्रमुख पाहुणे, महिला या सर्वानी यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज केले आणि विद्यार्थ्यांनी त्यांनी तयार केलेल्या कृतींविषयी विस्तृत माहिती दिली.
या कार्यक्रमात नंदोरी केंद्राच्या ११ शाळेतील २७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, सिखे संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक हर्षवर्धन डांगे, केंद्रप्रमुख माया जुनघरे, शाळा व्यवस्थापन समितीचे ढवस आणि एकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिखेच्या पल्लवी वाळके, स्वाती निकोसे, शिवशंकर बांदुरकर, कल्याणी भोस्कर, योगेंद्र काटकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजगिरे तसेच शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनापासून तर कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nottm Forest vs Newcastle) (Lance Reddick) (F1) (OPPO N2 Flip) (IND vs AUS) (Australia vs India) (Bhadravati) (Nandori)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here