गडचिरोली : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी

475

– पावसाचा काहींना फटका तर काहींना फायदा
The गडविश्व
गडचिरोली, १८ मार्च : जिल्हात अनेक ठिकाणी मुसळधार तसेच तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असुन जिल्हा मुख्यालयात १८ मार्च रोजी सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाले असुन हवामान विभागाने दर्शविलेला अंदाज खरा ठरला आहे. या पावसाने काहींना फटका बसलेला आहे तर काहींना फायदा झाल्याचे कळते.
आयएमडी नागपूर यांनी पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्हयात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना वादळीवाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता १७ मार्च रोजी वर्तविली होती. त्यानुसार नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी असे सुध्दा आवाहन केले होते. तर हवामान विभागामार्फत गडचिरोली व चंद्रपर जिल्हयाकरिता १७ व १८ मार्च ला ऑरेंज अलर्ट तर १९ ते २१ मार्च दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्हयात कुठल्या भागात किती प्रमाणात पाऊस पडला याबाबतचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे येणे बाकी आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nottm Forest vs Newcastle) (Lance Reddick) (F1) (OPPO N2 Flip) (IND vs AUS) (Australia vs India)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here