The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ नोव्हेंबर : तालुक्यातील मुरूमगाव येथे खरीप हंगाम २०२०- २१ मध्ये ३ करोडचा धान घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याबाबत प्रादेशिक कार्यालयाने मुरूमगाव येथील पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या प्रकरणातील आरोपी केंद्रप्रमुख गुरुदास लहुजी धारणे यांना २५ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत आ. वि.का. संस्था खरेदी केंद्र मुरूमगाव येथे आधारभूत खरेदी योजना हंगाम २०२१- २२ मध्ये खरीप पणन हंगामातील अंदाजे ९८७८.९५ क्विटल धान्य गोडावूनला शिल्लक नसल्याने संस्थेचे व्यवस्थापक एल.जी. धारणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक धिरज चौधरी, प्रतवारी कार तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकडे यांना सबंधित विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र समाधानकारक खुलासा न दिल्याने उपप्रादेशिक व्यवस्थापक धिरज चौधरी आणि विपपन निरीक्षक राहुल कोकोडे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर
तपासणी अधिकारी बावणे उपप्रादेशिक कुरखेडा यांनी दिनांक १८ ऑगस्ट २०२२ ला मुरुंगाव येथील पोलिसात तक्रार दाखल केली. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ वाजवून दिलेल्या ३ करोड २ लाख अपरातफर प्रकरणात मुरूमगाव येथील पोलीस मदत केंद्रात व्यवस्थापक एल.जी.धारणे, केंद्रप्रमुख गुरुदेव धारणे, शंकर कुंभरे, राहुल कोकडे, संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि अज्ञात व्यापारी यांच्या विरोधात ३१ ऑगस्ट २०२२ ला ४२०, ४०६, ४०९, ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुरगाव येथील पोलीस मदत केंद्रात आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर २५ नोव्हेंबर २०२२ ला केंद्रप्रमुख गुरुदास धारणे यांना अटक करुण न्यालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसाची पोलिस कोठडी दिलेली आहे. अधिकचा तपास मुरुमगाव पोलीस मदत केंद्राचे तपास अधिकारी जी.एस. आठवे करित आहेत.